सावंतवाडी / प्रतिनिधी-
अमेरीकेत आता जनजिवन पुर्वपदावर येऊ लागले आहे. कोरोना रोखण्यासाठी व्यापक प्रमाणात लसीकरण झाल्याने हे शक्य झाले आहे. अमेरीकेत आता सप्टेबर अखेर पर्यत जनजिवन पुर्ववत होणार आहे. तशी तयारी अमेरीकेने केली असुन कोरोना रोखण्यासाठी लसीकरण करणे हाच एकमेव मार्ग आहे. भारतातही त्याचा अवलंब व्हावा असे अमेरीकेत कॅलिफोनिॅया विदयापिठात पर्यावरण अभियात्रिक विभागात पीएचडी करणारया गंधार अभय पंडित या सावंतवाडीच्या सुपुत्राने सांगितले.झुम मिटींगच्या सहाय्याने त्याने सावंतवाडीतील पत्रकारांशी संवाद साधला. अमेरीकेत ५२ टक्के नागरीकांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे कोरोनासाठी लागु करण्यात आलेले निॅबंध कमी झाले आहेत. दोन डोस घेतलेल्याना मास्क वापरण्याची आता आवश्यकता नाही. आता अमेरीकेत जनजिवन पुर्वपदावर येऊ लागले आहे. लसीकरण मोठया प्रमाणात झाल्याने हे शक्य आहे. भारतातही लसीकरण व्यापक प्रमाणात झाले पाहीजे. अमेरीकेत फायझर, माॅर्डना आणि जाॅन्सन अॅण्ड जाॅन्सन अशातीन लशी कोरोनावर उपलब्ध आहेत. त्यात फायझर आणि माॅर्डनाची ईफीसियन्सी जास्त आहे. या लसीचे दोन डोस घ्यावे लागतात. तर जाॅन्सनचा एक डोस घ्यावा लागतो असे पंडित याने सांगितले.