22 वर्षीय एबीगॅलला 7 कोटींची व्हॅक्सिन लॉटरी
अमेरिकेच्या ओहायोमध्ये लसीकरणाला चालना देण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘व्हॅक्स-ए-मिलियन’ मोहिमेच्या अंतगंत 5 पैकी पहिल्या विजेत्याचे नाव जाहीर झाले आहे. यात कोरोनाची लस घेणाऱया 22 वर्षीय ऐबीगॅल बुगेन्स्कीने 7 कोटी रुपयांहून अधिक रकमेची लॉटरी जिंकली आहे.
प्रथम तर मला कुणीतरी माझी थट्टा केल्याचे वाटले. पण गव्हर्नर माइक डेवाइन यांच्याशी बोलणे झाल्यावर माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. आनंदाच्या ओघात रडू लागल्याचे तिने म्हटले आहे.
ऐबीगॅलला रडताना पाहून तिच्या आईवडिलांना तिच्यासोबत काहीतरी वाईट घडल्याचे वाटले. दशलक्ष डॉलर्सची लॉटरी जिंकल्याचे तिने सांगताच आईवडिलांच्या चेहऱयावरील आनंद ओसंडून वाहत होता. एबीगॅल मॅकेनिकल इंजिनियर आहे. ती सिनसिनाटीच्या जीई एव्हिएशन कंपनीत काम करते.
ऐबीगॅलच्या विजयाने प्रभावित होत अन्य ओहियन्सलाही लस घेण्याची प्रेरणा मिळणार असल्याचे उद्गार गव्हर्नर डिवाइन यांनी काढले आहेत.