ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
ज्या जिल्ह्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात लसीकरण झाले आहे, त्या जिल्ह्यांच्या दंडाधिऱ्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (दि.3) बैठक घेणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या सभेला संबंधित राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित असतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जी 20 परिषदेसाठी रोमला आहेत. ते भारतात परतल्यावर ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना लसीच्या पहिल्या डोसचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे, व दुसऱ्या डोसचेही प्रमाण कमी आहे, अशा जिल्ह्यांच्या दंडाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक करतील. महाराष्ट्र, झारखंड, मनीपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, नागालँडसह अन्य काही राज्यातील जिल्हा दंडाधिकारी या बैठकीला उपस्थित असतील.