सातारा / प्रतिनिधी:
सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे लसीकरण सुरू आहे. सातारा जिल्ह्यात ही 180 केंद्रावर लसीकरण सुरू असून अपुऱ्या लस पुरावठ्यामुळे गेले दोन चार दिवस नागरिकांना परत जावे लागत होते. त्यामुळे आज सकाळी लवकर सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात लस घेण्यासाठी नागरिकांची मोठी रांग लागल्याचे चित्र पहायला मिळत होते. वयोवृद्ध, आजारी लोक ही रांगेत सकाळपासून ताटकळत उभे होते. जिल्ह्याला होणारा लस पुरवठा आणि मागणी पाहता हे चित्र रोज दिसले तर नवल नाही.