ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
ऑक्सफर्ड- ॲस्ट्राझेनेकाची कोरोना लस घेतल्यानंतर धमन्यांमध्ये रक्ताच्या गाठी होत असल्याचे समोर आल्यानंतर युरोपातील डझनभर देशांनी या लसीचे लसीकरण थांबविले. मात्र, या लसीमुळेच रक्ताच्या गाठी होत असल्याचा कोणताही पुरावा अद्याप उपलब्ध नसल्याने युरोपियन देशांनी कोरोनाचे लसीकरण थांबवू नये, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.
WHO चे प्रवक्त॓ क्रिस्टियन लिंडमेअर म्हणाले, युरोपियन युनियन आणि युकेत 17 दशलक्ष लोकांना कोरोनाची ही लस देण्यात आली आहे. त्यापैकी केवळ 40 लोकांमध्ये रक्ताच्या गाठी होणाचा प्रकार दिसून आल्याचे ॲस्ट्राझेनेका सांगते. मात्र, या रक्ताच्या गाठी लसीमुळे झाल्याचा कोणताही पुरावा अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे लोकांचे जीव वाचावे आणि या विषाणूमुळे कोणताही गंभीर आजार होऊ नये, यासाठी लसीकरण सुरू राहणे आवश्यक आहे. त्यामुळे युरोपियन देशांनी लसीकरण सुरू ठेवावे.