वाठार किरोली : सध्या राज्यासह सातारा जिल्ह्यामध्ये सगळीकडे कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. ग्रामस्तरीय समिती ही प्रत्यक्षात गावामध्ये काम करीत आहे. त्यामुळे सरपंच हा त्या ग्रामसमितीचा प्रमुख भाग आहे. गेली १४ महिने सरपंच ग्रामस्तरीय समितीमार्फत कोरोना महामारीशी लढत आहेत. परंतु शासनाने त्यांच्या विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना लसीकरण केले. परंतु महामारीमध्ये सर्वात पुढे काम करणारा सरपंच हा शासनाला दिसला नाही. १ जुन पर्यंत सर्व सरपंचांना लसीकरण न झाल्यास सरपंच परिषद पुणे काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी दिला.
तसेच कोरोनामुळे मयत होणारा सरपंच वा सदस्य यांना विमा संरक्षण दिले पाहिजे, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.