बेंगळूर : राज्यात 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास 1 मे रोजी सांकेतिकपणे प्रारंभ करण्यात आला होता. मात्र, लससाठा उपलब्ध नसल्याने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले नाही. 10 मेपासून लसीकरण सुरू होईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले होते. मात्र, राज्यात सोमवारपासून लॉकडाऊन जारी झाल्यामुळे 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण 14 दिवस लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात पुरेशी लस उपलब्ध आहे. त्यामुळे युवकांना लस देण्यात अडचण नाही. मात्र, सोमवारपासून लॉकडाऊन जारी झाल्यामुळे युवा वर्गाला इस्पितळ किंवा लसीकरण केंद्रांमध्ये येणे शक्य नाही. वाहने घेऊन बाहेर पडण्यावर निर्बंध असल्याने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण शक्य नाही. त्यामुळे मोहीम लांबणीवर टाकण्याबाबत चर्चा केली आहे, असे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले. बेंगळूरमध्ये
सोमवारी पत्रकारांशी ते बोलत होते.
Previous Articleखेडय़ांसाठी 8,105 ऑक्सिजन बेडची व्यवस्था करणार
Next Article येळ्ळूर संपूर्ण लॉकडाऊन; ग्रा.पं.कडून जनजागृती
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.