जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांच्याकडून सुचना लस उपलब्ध होताच ऍक्शन मोडवर कार्यवाही
प्रतिनिधी /सातारा
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सातारा जिह्यात लसीकरण मोहिम वाढवण्याचे आदेश दिले गेले आहेत. त्या आदेशानुसार सातारा जिह्यात आरोग्य विभागाच्यावतीने कृतीयुक्त आराखडा तयार करण्यात आला आहे. लस उपलब्ध होताच त्या आराखडयानुसार ऍक्शन मोडवर कार्यवाही करण्यात येणार आहे. तशा सुचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशान पवार यांनी दिल्या गेल्या आहेत. जिह्यातील 495 लसीकरण केंद्राद्वारे हे नियोजन करण्यात आले आहे.
कोरोनाला रोखायचे आणि हरवायचे असेल तर लसीकरण महत्वाचे आहे. सातारा जिह्यात लसीकरण मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. लस केंद्रावर उपलब्ध होताच ती काही तासातच संपते आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लसीकरण वाढवण्याबाबत सातारा जिह्यात आदेश दिले आहेत. त्यानुसार जिह्यात जास्तीत जास्त लसीकरण कसे करता येईल याकरता आराखडा तयार करण्यात आला आहे. जिह्यातील 11 ग्रामीण रुग्णालये, 71 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 400 उपकेंद्रे अशी 495 लसीकरण केंद्रामार्फत हे नियोजन करण्यात येत आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रामार्फत त्या भागातील गावांमध्ये लसीकरण मोहिम राबवण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात येते आहे तसेसच गरोदर मातांचे लसीकरण मोहिम हाती घेण्यात येणार आहे. ज्या प्रमाणात वरुन लसीचा पुरवठा होईल त्या प्रमाणात लगेच लसीकरण जिह्यात राबवण्यात येत आहे. पाठीमागच्या चार दिवसांपूर्वी कोव्हील्शील्डचे 23 हजार व कोव्हॅक्सीनचे 25 हजार डोसेस आले होते. हे डोस लगेच संपले. लस येईल तशी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे डॉ. राधाकिशन पवार यांनी सांगितले.