प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यात सातत्याने लसीचा तुटवडा जाणवत आहे. लसीकरणासाठी आता तर केंद्राबाहेर तुंबळ हाणामारीच होण्याची शक्यता आहे. लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु केलेली आहे. त्या नोंदणीत अनेक त्रुटी आहेत. ज्या हॉस्पिटलमध्ये लसच नाही त्या हॉस्पिटलचे नाव लसीकरण केंद्राच्या यादीत आले असल्याने सामाजिक कार्यंकर्त्यांनी फोन करुन हॉस्पिटल व्यवस्थापनाची चांगलीच झापाझापी केली.
सातारा जिह्यात लसीकरणाचा तुटवडा दुसऱया टप्यापासून जाणवत आहे. सध्या तिसरा टप्पा सुरु झाला आहे. लस घेण्यासाठी प्रत्येक नागरिक लस घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, नव्याने ऑनलाईन नोंदणी करुन लस घेण्याचा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमामध्ये ऍपवरील नोंदणी काही वेळातच बंद पडत आहे. तसेच काही त्रुटी आहेत. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्याकडून हॉस्पिटल व्यवस्थापनांची झापाझापी सामजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. दरम्यान, लस मिळवण्यासाठी लसीकरण केंद्राबाहेर हाणामारीच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.