ब्रिटनच्या मुख्य वैज्ञानिकाकडून शक्यता व्यक्त
लसीमुळे कोरोना विषाणूला रोखले जाऊ शकत नाही असे उद्गार ब्रिटनचे मुख्य वैज्ञानिक सल्लगार सर पॅट्रिक वॉलेस यांनी काढले आहेत. मार्च महिन्यापूर्वी लस मिळणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आजपर्यंत केवळ चिकनपॉक्स हा एकच आजार लसच्या मदतीने नष्ट करता आला असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
ऋतूवर आधारित आजार
कोरोना विषाणूवरील उपचार हंगामी आजाराप्रमाणे होऊ शकतो. लस संशोधन पूर्वीच्या तुलनेत अधिक प्रगत झाले आहे, तरीही अद्याप मोठय़ा संख्येत लोकांपर्यंत पोहोचणारी लस तयार करणे अवघड असल्याची माहिती वॉलेस यांनी ब्रिटनच्या संसदीय समितीला दिली आहे. संक्रमण पूर्णपणे रोखणारे लस तयार होण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
लसीचे अनेक लाभ होणार
आजार फैलावत राहिल आणि कुठेकुठे तो सर्वसाधारण ठरण्याची शक्यता अधिक आहे. लसीकरणामुळे संसर्गाची शक्यता कमी होईल आणि विषाणूमुळे होणाऱया आजाराचे गांभीर्य आणि तीव्रताही कमी होणार आहे. लसीकरणानंतर हा विषाणू सर्वसाधारण फ्ल्यूसारखा ठरणार असल्याचे वॉलेस यांनी म्हटले आहे.
तिसऱया टप्प्यातील चाचणी
अनेक लसींनी इम्युन रिस्पॉन्स तयार केला आहे, परंतु तिसऱया टप्प्यातील चाचणीनंतरच संसर्ग रोखण्यास त्या सक्षम आहेत की नाही हे समजणार आहे. लस किती सुरक्षित आहे आणि मोठय़ा लोकसंख्येला लस कशाप्रकारे द्यावी हे देखील यातून समजणार असल्याचे पॅट्रिक यांनी म्हटले आहे.