ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात कोरोना लसीवर संशोधन सुरू आहे. रशिया, चीनसह काही देशांनी कोरोनावर लस शोधल्याचा दावाही केला आहे. असे असले तरी कोरोनावरील लसीवर अवलंबून न राहता कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यावर भर द्या, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.
कोरोनावरील लस तयार झाली तरी मागणी जास्त असल्याने पुरवठा होणार नाही. सर्व देशांना कोरोनापासून संरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणताही देश सुरक्षित राहणार नाही. त्यामुळे कोणत्याही देशाने कोरोनावरील लसीवर अवलंबून न राहता कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यावर भर द्यावा, असे डब्ल्यूएचओचे पश्चिम प्रांत विभागाचे संचालक डॉ. ताकेशी कसाय यांनी म्हटले आहे.
अनेक देशांनी कोरोना साथीच्या नव्या टप्प्यात प्रवेश केला आहे. या काळात सुरक्षित सार्वजनिक आरोग्याच्या दिशेने त्या-त्या देशांच्या सरकारने प्रयत्न केले पाहिजे, असेही ते म्हणाले.