ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जगातील कित्येक देश आणि देशातील कित्येक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. काहींना तर ह्या महामारीमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेत तर या कोरोना व्हायरसने कहरच केला आहे. सर्वाधिक कठीण परिस्थितीचा सामना अमेरिकेला करावा लागत आहे.
त्यातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिबंधित लस शिवाय कोरोना व्हायरस निघून जाईन असे वक्तव्य केले आहे.
सगळीकडे कोरोना विषाणूचा लसीचे संशोधन सुरू असतानाच ट्रम्प त्यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना व्हायरस हा कोणत्याही लसीशिवाय नष्ट होईल. असा दूर जाईल की आपण त्याला पुन्हा पाहू शकणार नाही. आतापर्यंत अनेक आजार आले आणि ते कोणत्याही लसीशिवाय निघून गेले तसाच कोरोना ही जाईल. पण हे सगळ लगेच घडेलच असं नाही.
मात्र एक वेळ अशी येईल की कोरोना नाहीसा झालेला असेल. असे असले तरी येणार्या काळात अमेरिकेत कोरोना मुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या 95 हजार किंवा त्यापेक्षाही अधिक असेल, असे ही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
दरम्यान सध्या अमेरिकेत 13 लाख पेक्षा अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आत्तापर्यंत 75 हजार पेक्षा अधिक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे.