प्राथमिक विभागातील 7हजार 861 शिक्षकांनी लसीकरीता केले रजिस्ट्रेशन
प्रतिनिधी/ सातारा
सध्या इयत्ता पाचवी पासुन ते महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ग घेण्याकरीता सरकारने परवाणगी दिली आहे. यानुसार कोरोना बाबतचे सर्व नियमावली पाळत हे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. याच अनुशंगाने शिक्षकवर्गांना देखिल लस घेणे बंधनकारक केले होते. यामध्ये शासनाकडुन केवळ प्राथमिक शाळेतील शिक्षकांनाच ही लस देण्यात आली. पण प्राथमिक विभागातील इयत्त 1 ली ते 4 थी पर्यंतच्या शाळा अद्याप बंदच आहेत. त्यामुळे हे शिक्षक लस घेऊन घरात बसले आहे.
वास्तविकरित्या माध्यमिक विभागातील शिक्षकांना देखिल ही लस देणे बंधनकारक होते. पण याबाबत विचारणा केली असता शासनाकडून लस घेण्याबाबत अद्याप कोणतीच गाईड लाईन आली नाही. पण विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही लस जे शिक्षक शाळेत शिकविण्याकरीता नियमीत शाळेत हजेरी लावतात त्यांनाच द्यायला हवी होती.
पण शासनाने केवळ प्राथमिक शाळेतील शिक्षकांना ही लस घेण्याकरीता नोंदणी करण्यास सांगितले होते. त्यानुसार साताऱयातील एकुण 7 हजार 861 शिक्षकांनी या संबंधीत ऍपवर लस घेण्याकरीता नोंदणी केली होती. यापैकी जवळपास सर्वच शिक्षकांनी ही लस घेतली आहे. ही लस घेतलेले काही शिक्षक मात्र लस घेऊन घरीच आहेत. कारण त्यांना इयत्ता 1 ली ते 4 थी पर्यंचे विद्यार्थी शाळेत अद्याप येत नसल्याकारनाने त्यांना घरीच थांबण्यास सांगितले आहे.
आता पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकेवर काढले आहे. त्यामुळे जिल्हय़ातील कित्त्येक शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षक बाधित असलेल्या घटणा उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे कोणतीही अनुचीत घटणा घडण्यापुर्वीच शासनाने माध्यमिक विभागातील शिक्षकांना देखिल लस द्यावी, अशी मागणी होत आहे.