ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानच्या पंजाबप्रांतात लस न घेणाऱ्या नागरिकांचे सिमकार्ड बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य मंत्री डॉ. यासमीन रशीद यांनी यासंदर्भात माहिती दिली.
रशीद म्हणाले, संपूर्ण देशभरासह पंजाब प्रांतातही 1 फेब्रुवारी पासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. मात्र, तीन लाख लोकसंख्या असलेल्या या राज्यात पहिली लस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठी लोक परतलेच नाहीत. त्यामुळे लाहोरमध्ये झालेल्या बैठकीत लस न घेणाऱ्या नागरिकांचे सिमकार्ड बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.