युगोव्हचे सर्वेक्षण : भाजपचे कार्यकर्त्यांची तुलनेत अधिक संख्येत तयारी
स्वदेशी लस कोव्हॅक्सिनला मंजुरी देण्यावरून झालेल्या वादानंतर राजकीय पक्षही समोरासमोर उभे ठाकले आहेत. तरीही अलिकडेच झालेल्या सर्वेक्षणात 49 टक्के भाजप तसेच 46 टक्के काँग्रेस कार्यकर्त्यांनी लस टोचून घेण्याची तयारी दर्शविली आहे. संशोधन कंपनीची भारतीय शाखा (युगोव्ह) आणि दिल्लीतील थिंक टँक सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चने सर्वेक्षण करविले आहे. यात 10 हजारांपेक्षा अधिक जणांनी भाग घेतला आहे.
केवळ 6 टक्के जणांचा नकार
केवळ 6 टक्के लोकांनी लस टोचून घेण्यास नकार दर्शविला. उर्वरित सर्वजण लस घेण्यास तयार आहेत. तत्काळ लस घेऊ असे 44 टक्के लोकांचे म्हणणे होते. 50 टक्के जण प्रभावोत्पादकता पाहिल्यावर निर्णय घेणार आहेत. लस घेण्यास नकार देणाऱयांची संख्या अमेरिकेसारख्या देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे.
राजकीय मतभेद
भाजपला समर्थन देणारे 49 टक्के लोक तत्काळ स्वतः आणि कुटुंबाकरता लस घेण्यास तयार आहेत. सर्वेक्षणात सामील 46 टक्के काँग्रेस समर्थकही लस घेण्यास तयार आहेत. 47 टक्के लोक प्रभावोत्पादकता पडताळल्यावर निर्णय घेणार आहेत. अन्य पक्षांच्या समर्थकांमध्ये 41 टक्के जण लस घेणार आहेत, तर 49 टक्के जण प्रभाव पाहतील आणि 10 टक्के जण लस टोचून घेणार नाहीत. कुठल्याही पक्षाला पाठिंबा न देणाऱयांपैकी 30 टक्के जण लस घेण्यास तयार आहेत. यातील 61 टक्के लोक प्रभावोत्पादकता पाहणार आहेत.