अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार 8 डिसेंबर 2021, सकाळी 11.20
●शासकीय कार्यालयात अंमलबजावणी सुरू
●लसीकरणाकडे ओघ पुन्हा वाढला
●ओमायक्रॉनची जनसामान्यांत भीती
● जिल्ह्यात 27 बाधित
● एकूण 2686 चाचण्या
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात काल 7 इतके निच्चांकी रुग्ण आढळल्यानंतर मंगळवारी रात्रीच्या अहवालात रुग्ण वाढ झाली असून 27 रूग्ण आढळले आहेत. दरम्यान ओमायक्रॉन व्हेरियंटचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे.
लसवंतांनाच शासकीय कार्यालये खुली
ओमायक्रॉनचा प्रवेश महाराष्ट्रात झाला असून सातारा जिल्ह्यालगत ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्याचे प्रशासन झाले असून शासकीय कार्यालयांमध्ये घेतलेले यांनाच प्रवेश दिला जात आहे. दरम्यान ओमायक्रॉनच्या भीतीने दुसरा डोस न घेतलेले लोक तसेच अद्याप एकही डोस न घेतलेले लोक करण्यासाठी गर्दी करू लागले आहेत.
ओमायक्रॉन व्हेरियंटला नागरिकांनी घाबरु नये
जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी कोरोनाचा नवीन ओमायक्रॉन व्हेरियंटला घाबरुन न जाता नागरिकांनी कोरोना संदर्भात शासनाने व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती द्यावी
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाला असला तरी संसर्ग पुन्हा वाढू नये, यासाठी परदेशातून येणाऱ्या नागरिकांचा शोध प्रशासन घेत आहे. आपल्या घराशेजारी नागरिक परदेशातून आला असले तर त्याची माहिती तात्काळ जिल्हा प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
बुधवारी जिल्ह्यात
नमुने-2686
बाधित-27
मुक्त-00
मृत्यू-00
उपचारार्थ-190