बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात लस उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण संथ गतीने सुरू आहे. दरम्यान, मुख्य सचिव पी. रवी कुमार यांनी, राज्यात कोरोना लस पुरवठा करण्यास बरेच दिवस नाही, तर काही महिने लागू शकतात असे म्हंटले आहे. ‘आम्हीही वाट पाहत आहोत. आवश्यक लस उपलब्ध होण्यास किती दिवस लागणार आहेत हे मी सांगू शकत नाही. यास काही महिने लागू शकतात, असे ते म्हणाले.
राज्य सरकारने दोन कोटी कविशिल्ड आणि एक कोटी कोव्हॅक्सिन यासह तीन कोटी लस खरेदीचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत फक्त ७ लाख डोस प्राप्त झाले आहेत. लसीच्या कमतरतेमुळे, ज्याचे वय ४५ वर्षांपेक्षा जास्त असेल त्यांनाच लस दिली जाईल आणि दुसर्या डोसची वाट पाहत आहेत त्यांना ही लस दिली जाईल. ४५ वर्ष आणि त्याहून वय असलेल्यांना १५ दिवसात १३ लाख कोविशील्ड आणि १ लाख कोव्हॅक्सिन वाटप केले गेले आहे. परंतु त्यांना केवळ ७ लाख कोविशील्ड आणि ८० हजार कोव्हॅक्सिन मिळाले. आता कोणतीही लस उपलब्ध झाल्यास, ती फक्त दुसर्या डोसची वाट पाहणाऱ्यांनाच दिली जाईल, असे ते म्हणाले. तसेच लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी सध्या उपलब्ध नाही.
लस कंपन्यांना जबाबदार धरण्याविषयी ते म्हणाले, “आम्ही ऑर्डर दिली आहे.” आम्हाला कंपन्यांनी वेळापत्रक द्यावे अशी आमची इच्छा आहे जेणेकरुन आम्ही त्यानुसार आमच्या योजना तयार करू शकू. चार महिन्यांत आम्हाला १ कोटी डोस प्राप्त झाले. एकूणच, आम्हाला लस ६.५ कोटी डोस आवश्यक आहेत. त्यामुळे लसीकरण आता हे त्यांचे उत्पादन, उत्पादन क्षमता आणि पुरवठ्यावर अवलंबून आहे. ‘ असे ते म्हणाले.