ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने ब्राझील, मोरक्को आणि सौदी अरेबियाला लस पुरविण्यास असमर्थ असल्याचे पत्राद्वारे कळवले आहे. सीरमने लस देण्यास असमर्थता दर्शवल्याने या देशांच्या लसीकरण मोहिमेमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे.
सीरमचे प्रमुख आदर पुनावाला यांनी या देशांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, जगभरातील अनेक देशांना लसींचा पुरवठा करण्यासाठी आम्ही मॅन्युफॅक्चरिंग युनीट वाढवत आहोत. मात्र, एका इमारतीला लागलेल्या आगीमुळे मॅन्युफॅक्चरिंग आऊटपुटवर प्रभाव पडला आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला नियोजित वेळेत लस पुरवठा करू शकत नाही.
दरम्यान, ब्राझील, मोरक्को आणि सैदीने भारताला 2 कोटी लसींची ऑर्डर दिली होती. आतापर्यंत ब्राझीलला त्यामधील 40 लाख लसेंचे डोस देण्यात आले. तर मोराक्कोला 70 लाख आणि सौदीला 30 लाख लसींचे डोस देण्यात आले आहेत.