बेळगाव प्रतिनिधी
लहान मूल म्हणजे मातीचा गोळा… त्याला घडवावे तसे ते घडत जाते. मात्र सोहम स्वत: घडता घडता मातीच्या गोळय़ाला आपल्या मनातील आकार देण्याचा प्रयत्न करतोय ते कौतुकास्पदच म्हणायला हवे . हातात असलेला मातीचा गोळा शेकडो वेळा तोडून त्यातून आपल्या मनाजोगी मूर्ती बनविण्याचा मुलांचा खटाटोप पाहता भावी शिल्पकार यातून निर्माण होतील याची शाश्?वती येते
लहानग्यांच्या हातातून बापाच्या मूर्ती पुन्हा आकार घेऊ लागल्या आहेत. भांदूर गल्ली येथील अवघ्या 10 वर्षाचा चिमुकला सोहम काळभैरव हा शाडूच्या मातीतून आपल्या आवडत्या बाप्पाची मूर्ती गेल्या चार वर्षा पासून साकरत आहे. दरवषी तो गणेशोत्सवानिमित्त गणेश मूर्ती साकारतो व त्याचे विसर्जन देखील घरातच करतो. मूर्ती घडविण्याची त्यांची धडपड पाहिली, की त्याच्या कलागुणांना वाव दिल्यास त्याची अभिरुची जाणून घेणे अवघड गोष्ट नसल्याची प्रचीती येते.अवघ्या सहा वर्षांचा असताना तो शाडू पासून मूर्ती बनवत आहे. आधी बापाचे पोट तयार करून नंतर वेगवेगळी अंगे जोडून आकर्षक अशी मूर्ती बनवतो. त्यानंतर त्याला रंग काम करून कुंदन वर्क देखील सुरेख करतो
मूर्ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य तो आपल्या आई-वडिलांकडून बाजारात जाऊन विकत घेतो, तसेच बाप्पाची मूर्ती तयार करण्याशिवाय त्याला चित्रकला, , नृत्य याची सुद्धा आवड आहे. याशिवाय त्याने अनेक स्पर्धेमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांकाची बक्षिसे देखील मिळवली आहेत.