चोरटय़ांनी चांदीच्या दागिन्यांवर मारला डल्ला
प्रतिनिधी/ लांजा
शहरातील सोनारगल्ली येथील सोन्या-चांदीचे खेडेकर ज्वेलर्स या दुकानाचे कुलूप तोडून चोरटय़ाने दुकानात प्रवेश करत आतील चांदीच्या वस्तूंवर डल्ला मारला. यामध्ये 2 लाख 70 हजार रुपयांचे चांदीचे दागिने चोरटय़ांनी लंपास केले. शनिवारी पहाटे भरवस्तीत घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. चोरीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही पॅमेरात कैद झाला आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, लांजा शहरातील सोनारगल्ली येथे प्रदीप पांडुरंग खेडेकर यांचे खेडेकर ज्वेलर्स नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. खेडेकर हे शुक्रवारी 24 डिसेंबर रोजी रात्री दुकान बंद करून घरी गेले होते. शनिवारी पहाटे 3 च्या सुमारास चोरटय़ाने खेडेकर यांच्या दुकानाचा कडी-कोयंडा कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. यावेळी तो दुकानात हाताला मिळेल ते चांदीचे दागिने पिशवीत घालून पहाटे 3.30 वाजता दुकानाबाहेर पडला. त्यानंतर तो पुन्हा थोडय़ावेळाने दुकानात आला. यावेळी त्याने दुकानातील उर्वरित चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. त्यानंतर 3.45 च्या दरम्यान हा चोरटा दुकानाबाहेर बाहेर पडला. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्ही पॅमेऱयात कैद झाला आहे.
चोरटय़ाने तोंडावर मास्क लावल्याने त्याचा चेहरा हा सीसीटीव्ही पॅमेरात स्पष्ट दिसत नाही. या चोरीच्या घटनेत मालक प्रदीप खेडेकर यांचे 2 लाख 70 हजार रुपयांचे चांदीचे दागिने चोरीला गेले आहेत. शनिवारी 25 डिसेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांना ही माहिती देण्यात आली. यानंतर लांजा पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुगडे हे घटनास्थळी दाखल झाले.
चोरटय़ाने फोडली आणखी दोन घरे
या चोरटय़ाने बाजारपेठ येथील आणखी 2 घरे फोडली आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले होते. या घटनेप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरटय़ावर भादंविक 454, 457, 380 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास लांजा पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूगडे हे करत आहेत.