प्रतिनिधी// लांजा
मुंबई-गोवा महामार्गावर लांजा शहरातील आय. टी. आय. कॉलेज येथे दुचाकी व आयशर ट्रक यांच्यात समोरासमोर धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान घडली. दरम्यान या अपघातातील 30 ते 35 वयोगटामधील मृत तरुणाची ओळख पटवण्याचे काम शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून सुरू होते.