प्रतिनिधी / लांजा
लांजा शहरातील सारस्वत वसाहत पात्रादेवी खिंड येथील सार्वजनिक विहिरीचा रहाट तुटून पाणी भरत असलेली ५२ वर्षीय महिला ४० फूट उंच खोल विहिरीत पडल्याची घटना आज रविवारी सकाळी ९. ३० वाजण्याच्या दरम्यान घडली. घटनास्थळी शहरातील नागरिक व पोलिसांनी धाव घेऊन विहिरीत पडलेल्या महिलेला रस्सी व पाळण्याच्या सहाय्यने सुखरूप बाहेर काढले.
महिलेला विहिरीतून बाहेर काढल्यानंतर तिला लांजा ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करून अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.