चेन्नई
लाइफबॉयने आपल्या मासिक जागतिक उत्पादनात जवळपास 56 पटीने वाढ केली असल्याचे सांगण्यात येते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेच्या उत्पादनांना मागणी पाहून कंपनीने उत्पादनात वाढ केली असल्याचे सांगण्यात येत आहे.गेल्या मार्चपासून कोरोनाचे संक्रमण संपूर्ण जगासह भारतात विविध राज्यात जोर धरू लागलं असून गेल्या दोन महिन्यात हँड सॅनिटायझर, हँडवॉशच्या मागणीत चांगलीच वाढ दिसली आहे. हे पाहता लाइफबॉयने हँड सॅनिटायझरची उत्पादन क्षमता 56 पट वाढवली आहे तर दुसरीकडे हँडवॉशची क्षमता तीनपट वाढवली आहे.