नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नोव्हेंबर महिन्यात अनेक महत्त्वाची कामे करण्याची शेवटची तारीख आहे. पेन्शनधारकांना 30 नोव्हेंबरपर्यंत आपले जीवन प्रमाणपत्र (लाईफ सर्टिफिकेट) सादर करावे लागणार आहे. या मुदतीत जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास पेन्शन जमा होण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. पेन्शनधारकांना आपले निवृत्तीवेतन सुरू ठेवण्यासाठी दरवषी 30 नोव्हेंबरपर्यंत आपण हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. या जीवन प्रमाणपत्राचा अर्थ पेन्शनधारक जिवंत आहे. त्यानुसार पेन्शनधारकांना पेन्शन मिळणे सुरू ठेवण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत आपले जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
‘एलआयसी हाऊसिंग’मध्ये गृहकर्जासाठी सुसंधी
गृहकर्ज घेऊ इच्छिणाऱयांसाठी एलआयसी हाऊसिंग फायनान्सची विशेष गृह कर्ज ऑफर नोव्हेंबरअखेरीस संपत आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्सने 2 कोटी रुपयांपर्यंतच्या गृहकर्जासाठी 6.66 टक्क्यांपर्यंत व्याजदर कमी केला आहे. ही ऑफर 30 नोव्हेंबरपर्यंत घेतलेल्या गृहकर्जावरच लागू होईल. यानंतर कंपनी व्याजदरात वाढ करू शकते. ही सवलत नवे घर खरेदी करणाऱयांसाठी सुसंधी ठरणार असल्याने त्याचा लाभ उठवण्याचा प्रयत्न इच्छुक घेऊ शकतात.
जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी नोंदणी
जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता नववीच्या प्रवेशासाठी 30 एप्रिल 2022 रोजी होणाऱया निवड चाचणीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर आहे. या तारखेपर्यंत नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करता येतो. जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी इयत्ता नववीच्या प्रवेशासाठी 09 एप्रिल 2022 रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे.