प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल कारंडे यांची माहिती
पुरवठा विभागाकडून १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल कालावधीत मोहीम सुरू
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न आहे, अशा नागरिकांना आता धान्य मिळणार नाही. त्याचबरोबर शिधापत्रिका रद्द होणार आहेत. जिल्हा पुरवठा विभागाकडून १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल या कालावधीत शिधापत्रिकांची शोध मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल कारंडे यांनी तरुण भारत संवादशी बोलताना दिली.
एक लाखाहून अधिक उत्पन्न असणाऱ्यासाठी केंद्र सरकारने त्याबाबतचे आदेश काढले आहेत. तसेच अधिक उत्पन्न असणाऱ्या नागरिकांचा शिधापत्रिकांच्या शोध घेऊन त्या रद्द करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असून अन्नधान्य पुरवठा विभागाच्या वतीने शहर व तालुक्मयात कारवाई सुरू झालेली आहे. राज्यासह सोलापूर जिह्यात शोध घेऊन प्रत्यक्षात सुरू झाली आहे.
एक फेब्रुवारीपासून ही मोहीम सुरू झालेली असून विशिष्ट नमुन्यातील फॉर्म सोबत रहिवासी पुरावा द्यावा लागेल. तो एका वर्षाच्या आतील आवश्यक आहे. या फॉर्ममधील माहितीची प्रसंगी पोलिसांमार्फत छाननी करण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत. शासकीय, निमशासकीय नोकरदारांच्या शिधापत्रिका या मोहिमेत रद्द होणार आहेत. सगळÎाच कर्मचाऱयांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहे. सरकारी नोकरदारांना पांढऱया शिधापत्रिका देऊन शासनाने यापूर्वीच सवलती रद्द केल्या आहेत. याचा उपयोग फक्त महसुली पुरावा म्हणून होत होता. शिधापत्रिका रद्द झालेल्या कुटुंबाच्या मागणीनुसार महसुली पुराव्यासाठी स्वतंत्र शिधापत्रिका दिली जाणार आहे.
कुटुंबांना हमीपत्र द्यावे लागणार
नव्या एक लाखांपेक्षा जास्त उत्पन्नाच्या पत्र ते विषयी नमुना फॉर्म शासनाकडून अद्याप यायचे असून ते येताच वितरित केले जातील. एक लाख उत्पन्नाबाबत कुटुंबानी हमीपत्र द्यायचे आहे. यातून ज्या लोकांना देण्याची गरज नाही अशांची धान्य बंद होईल. खरोखरच जे गरजू आहेत, मात्र रेशन धान्यापासून वंचित आहे अशांना धान्य मिळेल यासाठी ही शोध मोहीम सुरू केली आहे.
अनिल कारंडे, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी
अशी होणार छाननी
– राज्यासह सोलापूर जिह्यात शिधापत्रिका शोध मोहीम प्रत्यक्षात सुरू झाली आहे
– स्लॅबचे, घरात डिश टीव्ही, चार चाकी वाहन किंवा स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहत असलेल्या नागरिकांना शिधापत्रिकेसाठी अपात्र करण्याचे
आदेश
– या मोहिमेत बीपीएल, अंत्योदय, एपीएल, पांढरी अशा सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची छाननी होणार आहे
– शिधापत्रिकाधारकांना एक विशिष्ट फॉर्म भरून द्यावा लागणार
– विचारलेली सर्व माहिती अचूक देणे बंधनकारक
– शिधापत्रिका रद्द झाल्यानंतर अर्ज केल्यास शासनाकडून पांढरी नवीन शिधापत्रिका मिळेल
– अपात्र शिधापत्रिकाचा शोध घेण्यासाठी जिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन