इटलीच्या लॉरेंजाना शहरात मिळणार घर
घर खरेदी करणे कुठल्याही व्यक्तीसाठी स्वप्नपूर्ती होण्यासारखीच असते. परंतु एक शहर असे देखील आहे, जेथे तुम्ही केवळ 1 युरो म्हणजेच 86 रुपयांत घर खरेदी करू शकतात. हे शहर इटलीत असून तेथे काही ऐतिहासिक घरांची विक्री करण्यात येणार आहे.
दक्षिण इटलीच्या बेसिलिकाटा क्षेत्रात लॉरेंजाना नावाचे सुंदर शहर असून तेथे नव्या रहिवाशांना आकर्षित करण्यासाठी 1 युरोच्या किमतीवर घरांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. इटलीच्या एका अन्य शहराने स्वतःच्या काही ऐतिहासिक घरांना विक्रीसाठी ठेवलंय आणि ते देखील कुठल्याही डिपॉझिटशिवाय.
इटलीच्या बहुतांश वस्त्या आणि गावांमध्ये खरेदीदारांना व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी हमीची गरज भासते. सर्वसाधारणपणे 2 हजार युरोंपासून 5 हजार युरोपर्यंतचे डिपॉझिट द्यावे लागते. पण लॉरेंजानामध्ये अशी कुठलीच अट ठेवण्यात आलेली नाही. हा पुढाकार फेब्रुवारी महिन्यात हाती घेण्यात आला आहे. अवघड प्रक्रिया आणि आवश्यक नियमांचे पालन करणे त्रासदायक ठरू नये या दृष्टीकोनातून आम्ही नव्या लोकांना त्यांच्या स्वप्नातील घर खरेदी करण्यास मदत करू इच्छितो असे उद्गार लॉरेंजानाचे महापौर मिशेल उन्गेरो यांनी काढले आहेत.
पण शहरातील काही इमारतींची स्थिती सध्या ठीक नाही. अनेक घरांचे दरवाजे तुटलेले आहेत. भिंतींवर गवत उगवले असून दगड गायब आहेत. अशा स्थितीत नव्या घरमालकांना वास्तू पुन्हा राहण्यायोग्य करण्याठी किमान 20 हजार युरोंची गरज भासणार आहे.