गोवा हस्तकला, ग्रामीण व लघु उद्योग विकास महामंडळाच्या दालनात गणेशमुर्त्यां दाखल
समीर नाईक / पणजी
गणेश चतुर्थी काही दिवसांवर येऊन ठपली आहे. या अनुषंगाने आता गणेशमुर्तींची चित्रशाळा गजबजु लागल्या आहेत. गोव्याच्या प्रत्येक कानाकोपऱयात गणेशमुर्तीना आकार दिला जातो तसेच त्यांची विक्री करण्यात येते. राज्य सरकार देखील त्यांना अनुदान देऊन प्रोत्साहन देण्याचे काम करतो. याच आधारे सध्या नेवगी नगर, मळा येथील गोवा हस्तकला, ग्रामीण व लघु उद्योग विकास महामंडळ मर्यादीत कार्यालयात देखील गणेशमुर्ती विक्रीसाठी दाखल झाले आहेत.
सुमारे 600 ते 700 गणेशमुर्त्यां दाखल
गोवा हस्तकला, ग्रामीण व लघु उद्योग विकास महामंडळ मर्यादीत कार्यालयात अनेक कारीगरांनी तयार केलेले सुमारे 600 ते 700 गणेशमुर्ती येथे दरवर्षी विक्रीस आणले जातात. गोव्यातील वेगवेगळय़ा तालुक्यात तयार करण्यात आलेल्या मुर्तींचा यात समावेश आहे. पूर्णपणे मातीचे सदर गणेशमुर्त्यां असतात. विविध रुपांमधील, आकर्षक रंगाच्या, काही लहान, काही मध्यम तर काही मोठय़ा आकारच्या गणेशमुर्त्यां येथे लोकांना हमखास भेटत असतात.
कमीत कमी किंमतीत उपलब्ध
आता उपलब्ध असलेल्या मुर्त्यां रु. 1000 ते रु. 3000 पर्यंत उपलब्ध आहे.
मुर्तीकारांना मिळते अनुदान
मळा येथील हस्तकला महामंडळाच्या दालनात पारंपारिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. दरवर्षी सदर मूर्ती तयार करण्यामागे मूर्तीकारांना एक मूर्ती मागे 100 रूपये अनुदान दिले जाते. सदर अनुदान 250 मूर्तीपर्यंत मर्यादित आहेत. राज्याच्या विविध भागातील जे महामंडळाशी नोंदणीकृत आहेत अशा पारंपारिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्तींची तपासणी करून नंतर विक्रीसाठी आणली जाते अशी माहिती हस्तकला महामंडळातर्फे देण्यात आली. 2019-20 या सालासाठी हस्तकला महामंडळामध्ये एकूण 419 मूर्तीकारांची नोंदणी असून त्यात 390 मूर्तीकारांना या अनुदानाचा लाभ झाला आहे. 2019-20 या सालासाठी 49027 मूर्तींना मंजूरी देण्यात आली आहे.