वृत्तसंस्था / दौसा
चर्चेत राहिलेल्या राजस्थानमधील दौसा लाचखोरीच्या प्रकरणी अखेरीस लाचलुचपत खात्याने आयपीएस मनीष अग्रवाल यांना मंगळवारी अटक केली आहे. आयपीएस अधिकारी असलेल्या अग्रवाल यांच्यावर हस्तकाच्या माध्यमातून 38 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप होता. 13 जानेवारी रोजी एसीबीने दौसामध्ये छापे टाकून कारवाई केली होती. या कारवाईत अतिरिक्त जिल्हाधिकारी पुष्कल मित्तल आणि पिंकी मीणा तसेच आयपीएस अधिकाऱयाचा हस्तक नीरज मीणा यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती.
अटकेनंतर व्हॉट्सऍप कॉलिंग आणि चॅटिंगच्या माध्यमातून हस्तक आणि दौसाचे तत्कालीन पोलीस अधीक्षक अग्रवाल यांच्यातील लाचखोरीच्या खेळाचा खुलासा झाला होता. याच्या आधारावर 21 दिवसांची चौकशी केल्यावर मंगळवारी अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे.