80 हजार रुपये लाच स्वीकारताना एसीबीने केली कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
मुनवळ्ळी (ता. सौंदत्ती) नगरपालिकेचा लाचखोर अभियंता एसीबींच्या जाळय़ात अडकला आहे. कंत्राटदाराकडून 80 हजार रुपये स्वीकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले आहे. गुरूवारी मुनवळ्ळी येथे ही कारवाई करण्यात आली आहे.
कनिष्ट अभियंता वेंकाप्पा कामण्णावर याला अटक झाली आहे. कंत्राटदार दुर्गाप्पा किन्नुरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एसीबीच्या अधिकाऱयांनी ही कारवाई केली आहे. मुनवळ्ळी येथे दुर्गाप्पा यांनी सरकारी कामे केली होती. त्याची बिले मंजूर करण्यासाठी कनिष्ट अभियंता वेंकाप्पा याने पाच टक्के लाच मागितली होती.
कंत्रादटार दुर्गाप्पा यांनी त्या कनिष्ट अभियंत्याविरुध्द एसीबीकडे तक्रार केली होती. एसीबीचे पोलीस प्रमुख बी. एस. नेमगौडा, पोलीस उपअधिक्षक महांतेश्वर जिद्दी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ए. एस. गुदीगोप्प, एच. सुनीलकुमार व त्यांच्या सहकाऱयांनी गुरूवारी सापळा रचून कनि÷ अभियंत्याला रंगेहात पडकले.
वेंकाप्पा कामण्णावरने सुरूवातीला 5 टक्के मागितले होते. त्यानंतर चार टक्क्यावर व्यवहार ठरला. सुरूवातीला 60 हजार रुपये घेवून त्याने बिले मंजूर केली होती. त्यानंतर केलेल्या चार कामांची बिले मंजूर करण्यासाठी आणखी 80 हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱयांनी त्याला रंगेहात पकडले आहे. यासंबंधी पुढील तपास सुरू आहे.