नुकसान भरपाईसाठी मागितली लाच
प्रतिनिधी/ बेळगाव
अतिवृष्टीमुळे कोसळलेल्या घराच्या नुकसान भरपाईसाठी 15 हजार रुपये लाच स्वीकारताना मसगुप्पी (ता. मुडलगी) येथील एका तलाठय़ाला एसीबीच्या अधिकाऱयांनी सोमवारी रंगेहात पकडले आहेत.
अशोक तळवार हा मसगुप्पीचा तलाठी असून सध्या मुडलगी तहसीलदार कार्यालयात तो काम करतो. अतिवृष्टीमुळे अरभांवी येथील आनंद धर्मट्टी या शेतकऱयाचे घर कोसळले होते. बी श्रेणीत समावेश करुन भरपाई मिळवून देण्यासाठी तलाठय़ाने त्या शेतकऱयाकडे 30 हजार रुपयांची लाच मागितली होती.
त्यामुळे आनंद धर्मट्टी यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. सोमवारी 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीचे पोलीस अधिक्षक बी. एस. नेमगौडर व पोलीस उपअधिक्षक वेणुगोपाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ए. एस. गुदीगोप्प, सुनीलकुमार व त्यांच्या सहकाऱयांनी अचानक छापा टाकून तलाठय़ाला रंगेहात पकडले आहेत.