प्रतिनिधी/ रत्नागिरी
खासगी प्रॅक्टिस करणाऱया डॉक्टरकडून लाच मागितल्याप्रकरणी खेड तालुक्यातील भरणे ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक आऱ डी. मासरकर यांचे निलंबन करण्यात आले आह़े त्यांच्याविरूद्ध लाचलुचपत विभागाकडून कारवाई करण्यात आली होत़ी
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खेड भरणे येथे खासगी प्रॅक्टीस करणाऱया डॉक्टरने मासरकर यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केली होत़ी क्लिनिकमध्ये गर्दी होत असून त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे, अशी नोटीस मासरकर यांनी ग्रामपंचायतीच्यावतीने देत कारवाईचा इशाराही देण्यात आला होत़ा दरम्यान हे प्रकरण मिटवण्यासाठी मासरकर यांनी 20 हजार रूपयांची मागणी केली होत़ी त्यानुसार डॉक्टर यांनी 10 हजार रूपये मासरकर यांना दिले व उर्वरित 10 हजार रूपयांची मागणी मासरकर यांनी केली होत़ी तडजोडीअंती 7 हजार रूपये देण्याचे डॉक्टरांनी कबुल केले हेत़े 28 सप्टेंबर 2020 रोजी सायंकाळी खेडमधील गणपती कप्पा हॉटेल येथे मासरकर यांनी डॉक्टरांना 7 हजार रूपये घेवून बोलावले हेत़े यावेळी लाचलुचपत विभागाने सापळा रचून मासरकर यांच्याविरूद्ध लाचप्रकरणी कारवाई केल़ी लोकसेवक असलेल्या मासरकर यांच्यावर प्रशासनाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आह़े