लातूर/प्रतिनिधी
लातूर शहरातील विशालनगर भागातील वर्दळीच्या ठिकाणी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर जीवघेण्या हल्ल्याची घटना सकाळी ११.३० वाजता घडली. घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. रोहन सुरेश उजळबे असे गंभीर जखमी विद्यार्थ्यांचे नाव आहे.