प्रतिनिधी / लातूर
कुसूमवात्सल्य फाऊंडेशन व सहारा प्रोडक्शन हाऊस यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या महिला सक्षमीकरण तसेच महिला सौंदर्य कला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील 30 महिलांनी सहभाग नोंदविला होता. त्यातील लातूर जिल्ह्यातील तीन महिलांना सौंदर्य मुकूट म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हेमलता कणकदंडे – महाराष्ट्राची किमया, विजया गोजमगुंडे – महाराष्ट्राची गायत्री, सायली बोडके-महाराष्ट्राची अस्मिता या सौंदर्य मुकूटांनी सन्मानित करण्यात आले.
या पुरस्काराने लातूर जिल्ह्यातील महिलांचा सन्मान वाढला असून महिलांच्या कलागुणांना वाव मिळाला असल्याचे बोलले जाते. पुरस्काराचे आयोजक वैशालीताई पाटील व डॉ.राजेंद्र भवाळकर यांनी महाबळेश्वर या स्पर्धेचे आयोजन केले होते. महाराष्ट्रातील 30 महिलांपैकी लातूरातील तीन महिलांनी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असले तरी उर्वरीत 27 महिलांनाही वेगवेगळ्या पुरस्कराने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्काराने महिलांच्या कलागुणांना वाव मिळणार असून तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत अनेक महिलांना बक्षीसे तसेच गिफ्ट हॅपरच्या माध्यमातून पुरस्कार देण्यात आले. यासाठी संपूर्ण राज्यातील 30 महिलांचा सहभाग होता. लातूर जिल्ह्याला मिळालेल्या प्रथम पुरस्काराने पुरस्कार विजेत्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.