तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
लातूर जिल्ह्यातील निलंगा आगाराच्या निलंगा-अकोला बस व ट्रकचा भीषण अपघात होऊन एकजण जागीच ठार झाला असून ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना लातूर-निलंगा राष्ट्रीय महामार्गावरील वाघोली पाटीजवळ घडली आहे.
या विषयी मिळालेली माहिती अशी, निलंगा आगाराची निलंगा-अकोला ही बस राष्ट्रीय महामार्गावरुन जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली यामध्ये ही बस बाजूच्या खड्यात जावून पल्टी झाली. अपघात होताच ट्रक चालक फरार झाला आहे. त्याचा शोध सुरु आहे. जखमींना लातूरच्या सर्वोपचार रूग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघातानंतर एसटीच्या पथकासह महामार्ग पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी लातूरचे अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव यांनी घटनास्थळाची पहाणी केली.