तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
औरंगाबादहुन एकटेम्पो कत्तलीसाठी गोवंश घेऊन हैदराबादकडे जात असल्याची गुप्त माहिती गोरक्षकांना मिळाली. त्यानुसार नवीन रेणापूर नाका याठिकाणी सापळा रचून सदरील टेम्पो पोलिसांना पकडून दिला असता पोलिसांनी टेम्पोची पाहणी केली. त्या टेम्पोत गोवंश अगदी दाटीवाटीत कोंबून तस्करी होत असल्याचे निदर्शनास आले सर्व गोवंश लातूर येथील जीवराज जैन गोशाळेत सोडण्यात आले व त्या टेम्पो चालक व त्याच्या साथीदारास अटक करण्यात आली.
घटनास्थळावर लातूरचे डी. वाय. एस. पी. सचिन सांगळे व शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक काकासाहेब लाकाळ हजर होते. याकामी शहरातील विश्व हिंदू परिषद तसेच अखिल भारतीय कृषी व गोसेवा संघ लातूरचे सर्व पदाधिकारी यांनी मोलाची कामगिरी बजावली तसेच यानंतर शहरात अशा प्रकारची तस्करी किंवा गोहत्या होत असल्यास विश्व हिंदू परिषद बजरंग दल लातूर आणखी तीव्र आंदोलन करणार आहे अशी सूचना प्रशासनास देण्यात आली.