200 कोटी रुपयांमध्ये व्यवहार
9/11 दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार ओसामा बिन लादेनचा भाऊ इब्राहिम बिन लादेनचे आलिशान निवासस्थान विकले जाणार आहे. अमेरिकेच्या लॉस एंजिलिस येथील हे घर 28 दशलक्ष डॉलर्समध्ये विकण्यात येणार आहे. भारतीय चलनात हा आकडा 2,08,31,30,000 रुपये इतका होतो.
इब्राहिम यांचे हे घर एका पॉश भागात आहे. ही मालमत्ता 2 एकरामध्ये फैलावलेली आहे. हॉटेल बेल-एअर आणि बेल-एअर कंट्री क्लबकडून हे घर पायी चालता येईल इतक्या अंतरावर आहे. 2001 मध्ये अमेरिकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पासून इब्राहिम येथे राहत नाहीत.
1983 मध्ये खरेदी
इब्राहिम यांनी ही मालमत्ता 1983 मध्ये खरेदी केली होती. त्यावेळी या मालमत्तेचा व्यवहार 2 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 1 कोटी 48 लाख रुपयांमध्ये झाल होता. इब्राहिम तेथे पूर्वाश्रमीची पत्नी क्रिस्टिन सिनाय यांच्यासोबत राहत होते. त्यावेळी घरात अनेक नोकर काम करायचे, सुरक्षारक्षकही तैनात होते.
1931 मध्ये निर्मिती
हे एक जुने आलिशान निवासस्थान असून त्याची निर्मिती 1931 मध्ये झाली होती. 2 एकर क्षेत्रात फैलावलेले हे निवासस्थान सुमारे 20 वर्षांपासून पूर्णपणे रिकामी पडले आहे. यात 7 बेडरुम्स आणि 5 बाथरुम्स आहेत.