ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि इतर 11 लष्करी अधिकाऱ्यांना हौतात्म्य आले. या हेलिकॉप्टरमधील 14 अधिकाऱ्यांपैकी बचावलेले ग्रुप कॅप्टन गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, 8 डिसेंबरला हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेल्या लान्स नाईक बी साई तेजाच्या कुटुंबाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.