अमेरिकेत उंटाच्या प्रजातीतील प्राणी लामापासून कोरोना विषाणूचे संक्रमण रोखणाऱया अँटीबॉडीज प्राप्त झाल्या आहेत. या अँटीबॉडीजच्या छोटय़ा आकारामुळे त्यांना नॅनोबडी म्हटले जात आहे. वैज्ञानिकांनी संक्रमण रोखण्यास मदत करणाऱया अँटीबॉडीजच्या एका सेटला आयसोलेट केले आहे. या नॅनोबडीला इनहेलर आणि नेजल स्प्रेमध्ये भरून दिले जाऊ शकत। असा दावा आहे. याचे प्रारंभिक परिणाम एका नियतकालिकात प्रकाशित करण्यात आले आहेत. नॅनोबडी द्रव्य आणि हवा या दोन्ही अवस्थेत सहजपणे राहू शकते. याला श्वसनाद्वारेही शरीरात घेतल्यास प्रभाव दिसून येणार असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. संशोधकांनी आयसोलेट केलेल्या एक सेटमध्ये किमान एक अँटीबॉडी एनआयएच-कोवएनबी-112 संक्रमण रोखण्यास सक्षम असल्याचे म्हटले आहे. या नॅनोबडीज अत्याधिक प्रभावी ठरतील अशी अपेक्षा आहे. उंटाच्या प्रजातीशी संबंधित प्राण्याच्या इम्यून सिस्टीमधून ही नैसर्गिकरित्या निर्माण विशेष अँटीबॉडी मिळाली आहे.
Previous Articleकोरोनाच्या संक्रमणाची 28 लक्षणे
Next Article नेपाळमध्ये झटका, चीनचे प्रयत्न सुरूच
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.