नवी दिल्ली : लार्सन ऍण्ड टुब्रो कंपनीला एका प्रतिष्ठित कंपनीकडून महत्वपूर्ण ऑर्डर मिळाली आहे. यामध्ये कंपनीला इमारती आणि कारखान्यांसह घर व्यवसायाशी संबंधीत बेंगळूरमध्ये सर्वात मोठय़ा टाउनशिपच्या निर्मिती प्रकल्पाची ऑर्डर प्राप्त झाली आहे. सदरच्या प्रकल्पात 39 टॉवर उभारले जाणार असून 6,768 घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. यासह या प्रकल्पात क्लब हाऊस, स्विमिंग पूल आणि अन्य संरचनासह 149 विलाच्या निर्मितीसह अन्य घटकांचा समावेश राहणार आहे. सदरचे क्षेत्र हे एकूण एक कोटी 34.3 लाख वर्गफूट राहणार असल्याची माहिती कंपनीने यावेळी दिली आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी जवळपास 42 महिन्यांचा कालावधी निश्चित केला आहे.
Previous Articleअंकिताच्या लग्नातील आहेरात काय?
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.