मुंबईः
अभियांत्रिकी क्षेत्रातली कंपनी लार्सन अँड टुब्रोला तिसऱया तिमाहीतील नफ्यात 2 टक्क्यांची घट अनुभवायला मिळाली आहे. याचा परिणाम म्हणून कंपनीचा समभाग बीएसईवर मंगळवारी बाजारात 2 टक्के घसरणीत पाहायला मिळाला. इंट्रा डेदरम्यान कंपनीच्या समभागाचे भाव 2075 रुपयांवर घसरले होते. कंपनीने ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 च्या तिमाहीत 2553 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला आहे. वर्षाच्या आधारावर तिमाहीत महसुलात 17 टक्के वाढ झाली असून कंपनीने 46,390 कोटी रुपयांचा महसुल प्राप्त केल्याची माहिती आहे.