वृत्तसंस्था / कोलंबो
झिंबाब्वे संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत यांना कोरोनाची बाधा झाली असल्याने ते लंका आणि झिंबाब्वे यांच्यात होणाऱया वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात उपलब्ध होवू शकणार नाहीत.
60 वर्षीय लालचंद राजपूत यांची कोरोना चाचणी घेण्यात आली आणि त्यामध्ये ते पॉझिटिव्ह आढळले. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून त्यांना 10 दिवसांच्या कालावधीसाठी हॉटेलमध्येच विलगीकरणात रहावे लागणार आहे. झिंबाब्वेचा संघ शनिवारी लंकेत दाखल झाला होता. त्याचप्रमाणे लंकेचा फलंदाज अविष्का फर्नांडोलाही कोरोनाची बाधा झाली आहे. 16 जानेवारीला उभय संघात पहिला, 18 जानेवारीला दुसरा आणि 21 जानेवारीला तिसरा वनडे सामना खेळविला जाणार आहे.