वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील लाल किल्ला अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आहे. मध्य दिल्लीच्या जिल्हाधिकाऱयांनी यासंबंधी एक आदेश काढला आहे. लाल किल्ला आणि नजीकच्या परिसरात बर्ड फ्ल्यूचे संक्रमण पाहता परिसर सर्वसामान्य जनता आणि पर्यटकांसाठी बंद करण्यात येत असल्याचे दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून प्रसिद्ध आदेशात म्हटले गेले आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या संचालकांच्या अनुमतीद्वारे लाल किल्ला सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे.
यापूर्वी लाल किल्ला परिसरात 14 कावळे आणि 4 बदके मृतावस्थेत आढळली होती. त्यांच्या मृतदेहातून प्राप्त नमुन्यांची चाचणी केली असता बर्ड फ्ल्यूची पुष्टी झाली होती. बर्ड फ्ल्यूची पुष्टी मिळाल्यावर प्रशासनाने लाल किल्ल्यामध्ये सर्वसामान्यांच्या प्रवेशावर 19 जानेवारीपासून 26 जानेवारीपर्यंत बंदी घातली होती.
प्रकियाकृत चिकनवर बंदी
दिल्लीतील अनेक बाजारपेठांसह छोटय़ा दुकानांमधील प्रक्रियाकृत तसेच कच्च्य ा चिकनच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. विक्रीसह चिकनच्या साठय़ावरही बंदी होती. दिल्ली सरकारने यासंबंधी आदेश काढला होता.