ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर हिंसाचार घडविल्याचा आरोप असलेला पंजाबी कलाकार दीप सिद्धू याच्यासह चौघांची माहिती देणाऱ्याला दिल्ली पोलिसांनी 1 लाखाचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
दीप सिद्धू, जुयागराज सिंग, गुरज्योत सिंग आणि गुरजंत सिंग हे दिल्लीतील हिंसाचारानंतर गायब आहेत. त्यांच्यावर 1 लाखाचे तर या हिंसाचारात सहभागी असल्याच्या आरोपावरून जजबीर सिंग, बुटा सिंग, सुखदेव सिंग आणि इक्बाल सिंग यांच्यावर प्रत्येकी 50 हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
दीप सिद्धू सध्या बिहारमध्ये लपून बसल्याचे वृत्त आहे. दिल्ली पोलिसांनी बिहार पोलिसांशी संपर्क साधला असून, दिल्ली पोलिसांचे एक पथकही बिहारला रवाना झाले आहे.