वार्ताहर / कंग्राळी खुर्द
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अष्टमीच्या मुहूर्तावर लाल बटाटय़ाने पन्नाशी पार करत नवा इतिहास रचला. बटाटा पिकाने उन्हाळी, पावसाळी आणि हिंवाळी हंगाम लागवडीमधील दरांचे सर्व उच्चांक मोडीत काढत 4500 वरून उसळी घेत 5300 रु. वर स्थिरावला. याआधी या पिकाला जास्तीतजास्त 3000 ते 3500 रुपयापर्यंतचा दर मिळाला होता. याआधी बेळगाव व्यतिरिक्त इतर बाजारपेठांमध्ये 4000 रु. प्रति क्विंटल असा भाव होता. देशातील सर्व बटाटा उत्पादक क्षेत्रामधील सर्वाधिक दर बेळगाव बाजार समितीमध्ये मिळाला असल्याची माहिती व्यापारी प्रकाश पाटील आणि संदीप मुंगारी यांनी दिली.
बाजारात शनिवारी लाल बटाटा स्थानिक 800 रुपयाने वधारला. सफेद कांदा 200 रुपये कमी झाला. इंदोर बटाटा, पुणा परिसरातील बेळगावचा बटाटा दर स्थिर आहेत. आग्रा बटाटा 200 रु. नी कमी झाला आहे.
बटाटय़ाचे भाव
जवारी
गोळा 1000 ते 1500 रु.
गुल्टा 2000 ते 2500 रु.
मध्यम 3000 ते 3200 रु.
गोळा 4000 ते 5300 रु.
सफेद 3000 ते 3500 रु.
परराज्यातील बटाटा आवक 17 ट्रक इतकी झाली होती. त्यापैकी इंदोर 6, आग्रा 1, तळेगाव 10 ट्रक बटाटा विक्रीसाठी आला होता, अशी माहिती व्यापारी विनायक होनगेकर यांनी दिली.
परराज्यातील बटाटय़ाचे भाव
इंदोर 3500 ते 3800 रु.
आग्रा 2800 ते 3500 रु.
तळेगाव 3000 ते 3500 रु.
बाजारात कांदा दरात 500 ते 1000 रुपयांची घसरण झाली. शनिवारी बाजारात 43 ट्रक इतकी कांदा आवक होती. यामध्ये कर्नाटकातील नवीन कांदा 5 ट्रक तर जुना कांदा 10 ट्रक इतकी आवक होती. महाराष्ट्रातून 20 ट्रक आवक यापैकी 5 ट्रक कांदा हा शेतकरी बांधवांचा तर उर्वरित सर्व कांदा आवक ही व्यापारी वर्गाची होती. याशिवाय मध्यप्रदेश दोन तर गुजरातमधून 1 ट्रक इतकी कांदा आवक झाली होती.
मंगळवारच्या बाजारात महाराष्ट्रातील जुना कांदा दर 500 रुपयांनी तर मध्यप्रदेशचा कांदा दर 1000 रुपयांनी कमी झाला. यावर्षी प्रथमताच गुजरातचा कांदा आवक झाली होती. मध्यप्रदेशचा कांदा आठवडय़ापासून नियमित येत असल्याची माहिती व्यापारी सिद्धार्थ नरेगावी यांनी दिली. कर्नाटकातील जुना आणि नवीन कांद्याचे भाव स्थिर आहेत.
कांद्याचे भाव
नवीन कर्नाटक जुना कर्नाटक
2000-4500 रु. 4000 ते 7000 रु.
महाराष्ट्र 5000 ते 7500 रु.
मध्यप्रदेशचा कांदा 4000 ते 6000 रु.
गुजरात 5000 ते 6200 रु.
इजिप्तचा कांदा दाखल
बुधवारी बाजारात मुंबईमार्गे बेळगावला इजिप्तचा दोन ट्रक कांदा व्यापारी बांधवांनी विक्रीसाठी पाठविला होता. त्याचा भाव 5500 ते 6500 रु. असा झाला.
शनिवारी बाजारात 3000 पोती इतकी आवक झाली होती. त्याचा भाव 800 ते 1200 असा झाला. बुधवारी बाजारात 15000 पोती इतकी रताळी आवक झाली होती. मात्र, रताळी उत्पादक क्षेत्रात काही भागात परतीचा पाऊस तर बऱयाच भागात दसऱयानिमित्त पाळणूक असते. शिवाय नवरात्रोत्सव संपत आला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी रताळय़ांची जावक होती. त्याठिकाणी रताळी शिल्लक असल्याने मागील बाजारापेक्षा मोठय़ा प्रमाणात रताळी आवक कमी झाली. त्याचा परिणाम रताळी दरात 100 रु. नी वाढ झाली असल्याची माहिती लेखापाल रामा पाटील यांनी दिली..