अनेक जणांचे मृतदेह तळाला
इजिप्तच्या किनाऱयापासून दूर लाल सागरात ब्ल्यू होलला ‘पाणबुडय़ांचे कब्रिस्तान’ म्हटले जाते. आजही याच्या तळाला अनेक मृतदेह असून त्यांचा शोध लावण्यात आला नसल्याचे मानले जाते. एव्हरेस्टवर मारले गेलेल्या गिर्यारोहकांचे मृतदेह तेथेच असून ते कधीच पुन्हा प्राप्त करता आले नाहीत, तसाच प्रकार ब्ल्यू होलबाबत घडतो.
समुदात एक रहस्यमय सिंकहोलला जगातीक नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक मानले जाते. अजाण पर्यटकांसाठी हा सिंकहोल मृत्यूचे दुसरे नाव आहे. 120 मीटर खोल सिंकहोलने अनेक वर्षांमध्ये शेकडो जणांचा जीव घेतला असल्याचा दावा करण्यात येतो.
ब्ल्यू होलची खोली आणि अजब संरचना, ज्यात एक 26 मीटर लांबीचे भुयार sखील सामील, ते नायट्रोजन नार्कोसिसचे कारण ठरते. उच्च दबावात काही वायू श्वसनावाटे शरीरात पोहोचल्यावर संबंधिताला भ्रमाचा अनुभव होऊ लागतो. अनेक लोक या ब्ल्यू होलमध्ये उतरतात आणि स्वतःचा जीव गमावून बसतात. 1997 मध्ये ब्ल्यू होलमधून दोन आयरिश पाणबुडय़ांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले होते. हे दोन्ही मृतदेह परस्परांना इंटरलॉक होते. यापैकी एकाने भीतीपोटी दुसऱयाला पकडून ठेवले होते आणि स्वतःच्या सहकाऱयालादेखील स्वतःसोबत खाली ओढले होते असे मानले जाते. या जोडप्याच्या स्मरणार्थ किनाऱयावर एक दगड ठेवण्यात आला होता, ज्याच्यासोबत आणखी अनेक दगड तेथे ठेवण्यात आले आहेत. याचमुळे अनेक लोक याला कब्रिस्तान देखील म्हणतात.
‘ब्ल्यू होल’शी निगडित सर्वात प्रसिद्ध कहाणी एका इस्रायली-रशियन व्यक्ती यूरीची आहे. यूरीने 2000 साली स्वतःच्या हेल्मेटमधील कॅमेऱयाद्वारे स्वतःचे अखेरचे क्षण टिपले होते. हे फुटेज अद्याप ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहेत. स्थानिक मच्छिमारांनी या मृत्यूंसाठी शतकांपेक्षा जुन्या एका शापाला जबाबदार ठरविले आहे. या ठिकाणी एका मुलीचा आत्मा वास करत असून तिने विवाहापासून वाचण्यासाठी यात उडी घेत जीव दिला होता अशी वदंता आहे.