वृत्तसंस्था/ मँचेस्टर
इंग्लंडचा फलंदाज डॉमिनिक सिबली हा ‘नो सलाईव्हा’ (लाळबंदी) नियमाचे उल्लंघन करणारा पहिला क्रिकेटपटू बनला आहे. पंचांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी ताबडतोब चेंडूला ‘सॅनिटाईज’ केले. दुसऱया कसोटीच्या चौथ्या दिवशी उपाहाराआधी 42 व्या षटकाच्या सुरुवातीला सिबलीकडून या नियमाचे अनावधानाने उल्लंघन झाले. त्याने स्वतः व त्याच्या संघसहकाऱयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पंचांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली. आयसीसीने कोव्हिड 19 पासून सुरक्षा मिळावी यासाठी हा हंगामी नियम बनविला असून सिबलीने कबुली दिली असल्याने त्याच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई होणार नाही. दुसऱयांदा या नियमाचे उल्लंघन झाल्यास त्याला ताकीद दिली जाईल आणि त्याच्या संघाला 5 धावांचा दंड केला