तालुक्मयात केवळ 22,112 जनावरांना लसीकरण : अद्याप 1,03,418 जनावरे शिल्लक
प्रतिनिधी / बेळगाव
राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तालुक्मयात ‘लाळय़ा खुरकत’ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेला 7
ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून आतापर्यंत केवळ 22,112 जनावरांना लसीकरण करण्यात आले असून अद्याप तब्बल 1,03,418 जनावरे शिल्लक आहेत. लसीकरण काम संथगतीने सुरू असल्याने केवळ 9789 पशुपालकांना याचा लाभ झाला आहे.
तालुक्मयातील गाय, बैल, म्हैस अशा एकूण 1 लाख 26 हजार जनावरांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट खात्यासमोर असून लसीकरण पशुपाशलकांच्या गोठय़ापर्यंत पोहोचविण्यसाठी विविध पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये एक पशुवैद्यकिय अधिकारी, एक पशुपरिक्षक, एक मैत्री कर्मचारी, एक मदतनीसाचा समावेश आहे. पशुपालकांच्या घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येत असून एकही जनावर वंचित राहू नये, यासाठी खात्याकडून प्रयत्न सुरू आहेत. ज्या जनावरांच्या कानांवर टॅग आहेत. अशा जनावरांना लसीकरण करण्यात येत आहे. त्याबरोबर लसीकरण केलेल्या जनावरांची माहिती ऑनलाईन पद्धतीने नोंद केली जात असल्याने काम संथगतीने होत असल्याची माहिती पशुसंगोपन खात्याने दिली आहे.
शेतीला जोड व्यवसाय म्हणून ग्रामीण भागात पशुपालनाला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे ग्रामीण भागात जनावरांची संख्या अधिक आहे. तालुक्मयात असलेल्या लहान-मोठय़ा 15 पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत घरोघरी जाऊन ही मोहीम राबविली जात आहे. गाय, म्हैस, बैल या जनवारांना लसीकरण करण्यात येत आहे. जनावरांना विविधप्रकारचे आजार उद्भवतात. त्याबरोबरच अलिकडच्या काही वर्षात लाळय़ा खुरकतची मोठय़ा प्रमाणात लागण होताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर खात्यामार्फत वर्षभरात दोन टप्प्यात ही मोहीम राबविली जाते. मात्र यंदा कोरोनामुळे जून महिन्याच्या पहिल्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला स्थगिती मिळाली होती. आता दुसऱया टप्प्यातील मोहीम सुरू आहे.
लाळय़ाखुरकत हा विषाणूजन्य रोग असून हा हवेमार्फत पसरत असतो. त्याची लागण झाल्यास जनावरांच्या जीभेला पुरळ उठतात व पायांना जखमा होऊन त्यात किड निर्माण होते. जनावर आजारी पडून दूध क्षमता कमी होते. त्यामुळे लसीकरण करून न घेतलेल्या पशुपालकांनी जनावरांना लाळय़ा खुरकत लसीकरण करून घ्यावे असे, आवाहन पशुसंगोपन खात्यामार्फत केले आहे.