ऑनलाईन टीम / मुंबई :
लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, गायिका देवयानी बेंदे यांच्यासह अन्य कलाकारांनी आज राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. मुंबईच्या पक्ष कार्यालयात हा सोहळा पार पडला.
मुंबई महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते बबनराव गवस, मनसेच्या महिला पदाधिकारी मनिषा खैरे, अशोकराव सवने, प्रभाकर शेटय़े, संजय त्रिपाठी, सुरेश बागवे, नितीन पाटील, ओंकार गवस यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सर्व नवीन सदस्यांचे अजित पवार यांनी स्वागत केले. तसेच नवीन पक्षप्रवेश करणाऱया सदस्यांसोबत सुसंवाद ठेवून त्यांना पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सामावून घ्यावे, अशी सूचना चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे मुंबई अध्यक्ष मनोज व्यवहारे व युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांना केली.