ऑनलाईन टीम / श्रीनगर :
श्रीनगरच्या लावापोरा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारपासून चकमक सुरू असून, आतापर्यंत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले.
सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाकडून लावापोरा परिसरात सध्या चकमक सुरू आहे. चकमक सुरू असलेल्या परिसरात दगडफेक करणाऱ्या युवकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.
सुरक्षा दलांना मंगळवारी या परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई सुरू केली. एका इमारतीत हे दहशतवादी लपून बसले होते, त्यापैकी तिघांचा बुधवारी खात्मा करण्यात आला.