येत्या दिवाळीपर्यंत स्मार्टफोन आणण्याचे संकेत
नवी दिल्ली
स्वदेशी मोबाईल कंपनी लावा इंटरनॅशनल येत्या दिवाळी अगोदर आपला पहिला 5-जी स्मार्टफोन सादर करण्याची योजना आखत असल्याचे समजते. ज्याची किमत 20,000 रुपयांपेक्षाही कमी राहणार असल्याची माहिती आहे. कंपनी येत्या दोन ते तीन वर्षात मोबाईल ऍक्सेसरीजमधील 20 टक्के हिस्सेदारी प्राप्त करण्याची शक्यता आहे, अशी माहिती लावा इंटरनॅशनलचे अध्यक्ष सुनील रैना यांनी दिली आहे.
स्मार्टफोनचा विचार केल्यास आम्ही जवळपास 15,000 ते 20 हजार रुपये किमत असणाऱया उत्पादनावर लक्ष केंद्रीत करणार आहोत. येत्या दिवाळीच्या जवळपास 5-जी नेटवर्क असणारा नवा आधुनिक स्मार्टफोन बाजारात आणणार असल्याचा दावा रैना यांनी यावेळी केला आहे.
नवी उद्दिष्टे…
कंपनीची स्मार्टवॉच आणण्याची तयारी
स्मार्टफोन बाजारात 10 टक्के वाटा काबीज करणार
भारताबाहेर 20 देशात विस्ताराची योजना